एक माणूस म्हणून माणुसकी दाखवण्याचे काम तरी आपण करायला हवं?... ते म्हणजे असं की, आज-काल माणूस फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण लक्ष देत आहे...एक निसर्गाचे देणे म्हणून आपण निसर्गाला मोबदला म्हणून त्याची परतफेड म्हणून काहीतरी कार्य करायला हवं ...ते म्हणजे झाडे लावणे त्याचं संवर्धन करणं ...तसेच निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचं जतन करणे, मुके जनावरांवर (प्राणीमात्रावर) प्रेम करणे, सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये व स्वतःच्या असणाऱ्या कौटुंबिक जीवनामध्ये व्यस्त असतो, मात्र प्राण्याने कोणाच्या आधारावर जगावं, प्राण्यांना तर बोलता येत नाही, प्राण्यांना सांगता येत नाही, त्यांची असणारी व्यथा व दुःख ते कोणासमोर मांडतील ... पाळीव प्राणी म्हणजे लोकांसाठी फॅशन बनून गेली आहे... मात्र ज्या जनावरांना कोणी वाली नाही त्यांचं काय..?त्यामुळे जेवढा अधिकार जगण्याचा आपणाला आहे तेवढाच या पृथ्वीतलावर असणाऱ्या असंख्य जीवाला (प्राणी, पक्षी) आहे , तुम्ही जगा , प्राण्यांना जगू द्या... तर चला प्राण्यांचा आधार बनुया व त्यांच्यासाठी पुढाकार घेऊया एक सुजाण नागरिक म्हणून काम करूया….
आपल्या माध्यमातून प्राण्यांबद्दल च्या भावना व्यक्त करता आल्या... धन्यवाद..🙏🏻
लेखन :मोहन भगवान खंडागळे
Thanks dear